महाराष्ट्र

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ, ५ लाख रोजगार देण्याचे उद्दिष्ट

मुंबई : मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमार्फत मुलुंड आणि ठाणे येथे झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यास नोकरीइच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले.

छत्रपती शिवाजी महाराज मैदान, चिंतामणी चौक, जांभळी नाका, ठाणे येथे आयोजित मेळाव्यात पाचवी पास उमेदवारापासून बीई, एमबीए अशा विविध पदवीप्राप्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. विविध कंपन्यांनी एकूण 4 हजार 152 पदांसाठी आज मुलाखती घेतल्या. यावेळी 398 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली तसेच 47 जणांची अंतिम निवड झाली.

शासकीय आयटीआय, मुलुंड येथे झालेल्या महारोजगार मेळाव्यात 9 हजार 063 इतक्या जागा विविध कंपन्यांनी मुलाखतीसाठी उपलब्ध करून दिल्या. या मेळाव्यात 813 नोकरीइच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यापैकी 306 उमेदवारांची प्राथमिक तर 22 उमेदवारांची अंतिम निवड विविध कंपन्यांमार्फत करण्यात आली.

५ लाख रोजगार देण्याचे उद्दिष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा
मंत्री लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात 5 लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये 300 रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या. ठाणे येथील मेळाव्यासाठी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, कौशल्य विकास सहायक आयुक्त संध्या साळुंखे, ठाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य स्मिता माने, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह विविध कंपन्या, आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. मुलुंड येथील मेळाव्यासाठी खासदार मनोज कोटक, आमदार मिहिर कोटेचा यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी, विविध कंपन्या, शासकीय महामंडळे यांचे प्रतिनिधी आणि नोकरीइच्छुक उमेदवार उपस्थित होते.

स्वयंरोजगारविषयक विविध योजनांचे मार्गदर्शन

याबरोबरच बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन देण्यासाठी मेळाव्यामध्ये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांनी सहभागी होत उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत प्रधानमंत्री मुद्रा योजनेसंबंधी आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निमिर्ती कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात आली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 महिने ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 महिने ago