Singer Asha Bhosle Meets MNS Chief Raj Thackeray At His Residence
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गेल्या महिन्यात लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर अनेक नेते मंडळी आणि निकटवर्तियांना राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यातच आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी देखील राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थावर त्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असल्यानं डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. या साठी जूनच्या पहिल्या आठवड्यात ते रुग्णालयात दाखल झाले असता कोरोनामुळे त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.
मंगेशकर कुटुंबीय आणि राज ठाकरे यांचे कौटुंबिक संबंध आहेत. राज ठाकरे नेहमी लतादिदींच्या घरी जायचे. लतादिदींच्या निधनानंतर आता आशाताईंनी राज यांची शिवतिर्थ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. मनसेच्या अधिकृत अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…