महाराष्ट्र

‘शूटिंग स्टार्स २०२५’ सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचे ५ डिसेंबर रोजी आयोजन

मुंबई: ‘शूटिंग स्टार्स 2025’ हा सेलिब्रिटी फुटबॉल सामना मुंबई येथे 5 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये टायगर श्रॉफ, सिद्धांत चतुर्वेदी यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी होणार आहेत. हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या प्रोजेक्ट महा-देवच्या अंतर्गत आयोजित केला जात आहे.

प्रोजेक्ट महा- देव हा महाराष्ट्रातील U-13 वयोगटासाठीचा पहिलाच असा राज्यस्तरीय उपक्रम आहे, ज्याचा उ‌द्देश भारतीय संघासाठी भविष्याचे उत्तम फुटबॉलपटू तयार करणे हा आहे. 2034 च्या FIFA विश्वचषकासाठी भारताच्या संघात किमान पाच खेळाडू महाराष्ट्रातून असावेत, हे या उपक्रमाचे ध्येय आहे.

या उपक्रमाचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत. टॅलेंट आयडेंटिफिकेशन (प्रतिभा शोध): ग्रामीण आणि शहरी भागातील लहान खेळाडूंना शोधून त्यांना संधी देणे. जागतिक दर्जाचे प्रशिक्षणः वैज्ञानिक कोचिंग, फिटनेस, मानसिक आधार, तांत्रिक प्रशिक्षण अशा सर्व सुविधा देणे. दीर्घकालीन खेळाडू विकासः शिक्षण, पोषण, मार्गदर्शन, आणि निवासी प्रशिक्षणाच्या मदतीने मुलांचा सर्वांगीण विकास करणे.

हा उपक्रम क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. मणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने राबवला जात आहे.

या बहुपदरी निवड प्रक्रियेत गावपातळीवरून 10,000 हून अधिक U-13 मुले आणि मुलींनी सहभाग घेतला होता. त्यातून 120 खेळाडूंनी राज्यस्तरीय अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता यातील 60 मुलांची पाच वर्षांच्या निवासी शिष्यवृतीसाठी निवड होणार आहे. या शिष्यवृत्तीत उच्च दर्जाचे प्रशिक्षण, शिक्षण, पोषण आणि 14 डिसेंबर रोजी लिओनेल मेसी यांच्या खास फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

‘शूटिंग स्टार्स 2025’ हा सामना या सर्व तरुण खेळाडूंना मोठी प्रेरणा देणार असून, महाराष्ट्राच्या तळागाळातील फुटबॉल व्यवस्थेच्या भक्कम बांधणीसाठी राज्याची बांधिलकी अधोरेखित करणारा आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे आकस्मिक निधन, चाहत्यांमध्ये शोककळा

मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…

4 दिवस ago

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…

4 दिवस ago

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…

4 दिवस ago

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

5 दिवस ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

7 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 महिना ago