महाराष्ट्र

शिवसेनेकडून कम्युनिटी फ्रिजची सुविधा, अन्नदान करण्याचे शिवसेना आमदाराकडून आवाहन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गरजूंना मदत करण्यासाठी कम्युनिटी फ्रिजची संकल्पना सुरु केली होती. त्यानंतर आता शिवसेनेकडून कम्युनिटी फ्रिजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुंबईतील माझगाव येथे बाप्टिस्टा उद्यानाबरोबरच शिवसेना शाखा 209 मध्ये हा उपक्रम आता सुरु झाला आहे. येत्या काही दिवसांत भायखळ्यात आणखी आठ ठिकाणी हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे.

शिवसेना उपनेते, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. “नॅश फाऊंडेशन” या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून माझगांव कोर्टशेजारील गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी कम्युनिटी फ्रिजची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नुकतंच या कम्युनिटी किचनचा शुभारंभ करण्यात आला.

गोरगरीब आणि गरजूंना मोफत अन्न मिळावे, या पार्श्वभूमीवर यामिनी जाधव यांनी भायखळा शिवसेना आणि नेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कम्युनिटी फ्रिज ही संकल्पना राबवली आहे. या संकल्पनेनुसार येत्या काही दिवसात आणखी आठ ठिकाणी कम्युनिटी फ्रिज म्हणजेच माणुसकीचा फ्रिज” हा उपक्रम सुरू करणार येणार आहे, असे यामिनी जाधव यांनी सांगितले.

माझगाव येथील बाप्टिस्टा उद्यानात कम्युनिटी फ्रिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्याकडील अन्न नागरिकांनी या कम्युनिटी फ्रिजमध्ये ठेवायचे. त्या फ्रिजचा गरजू लोकांनी लाभ घ्यायचा, अशी ही संकल्पना आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago