Sambhaji Raje Reaction On Maratha Reservation verdict
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. आमचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत त्यांना देऊ असं शरद पवार म्हणाले आहेत.
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेवरील राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपल्यानंतर पत्रकार परिषद घेत नवी राजकीय भूमिका जाहीर केली होती. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांची निवडणूक जून महिन्यात होणार आहे. या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपचे २, शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी होईल. सहाव्या जागेवर मला पाठिंबा द्यावा, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमचा एक प्रतिनिधी निवडून येण्यास अडचण नाही. संभाजीराजेंना उरलेली मत देण्यात येतील, असं म्हटलं आहे. आज रायगड जिल्ह्यातील उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.
राज्यसभेच्या द्वीवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. देशभरातील ५७ जागांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातील ६ जागांचा त्यामध्ये समावेश आहे. शिवसेनेचे संजय राऊत, भाजपचे पीयूष गोयल, विकास महात्मे, विनय सहस्त्रबुद्धे ,राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे पी.चिदंबरम यांचा कार्यकाळ संपल्यानं ६ जागांवर निवडणूक होत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करत राज्य सरकार आणि भाजपकडे पाठिंबा मागितला आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…