Man arrested in Shahada for sexually assaulting a woman he met on social media and threatening to make videos viral.
नंदुरबार : शहादा येथील २३ वर्षीय युवतीसोबत दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झालेल्या मालेगाव येथील ३४ वर्षीय युवकाने तिला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अश्लिल कृत्य केले आणि त्याचे व्हिडिओ चित्रीत केले. त्यानंतर त्या व्हिडिओस व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात व्हॅलेंटाईन डे (१४ फेब्रुवारी) रोजी शहादा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि त्याला अटक केली.
घटना अशी की, मालेगाव येथील मोहम्मद हसन आबिद हसन (वय ३४) याच्याशी शहाद्यातील २३ वर्षीय युवतीची सोशल मीडियावर ओळख झाली. हसनने युवतीला मालेगाव येथील एका हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्या युवतीचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मानसिक छळ केला. आरोपीने तिला आणि तिच्या कुटुंबीयांची बदनामी करण्याची धमकी दिली होती, त्यामुळे युवतीने ही घटना कोणालाही सांगितली नाही.
१४ फेब्रुवारी रोजी आरोपी शहादा येथे येऊन युवतीला धमकावण्यासाठी तिला शहरातील एका उद्यानात बोलावले. तेथे काही लोकांच्या लक्षात हे प्रकरण आले, आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलमध्ये युवतीचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ सापडले. यावरून पोलिसांनी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार १४ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला.
घटनेनंतर शहादा पोलिस ठाण्यात युवतीच्या नातेवाईकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आरोपी मोहम्मद हसन आबिद हसन याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…