सातारा

पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह सापडला, दोन दिवसांपासून होते बेपत्ता

सातारा : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. ते दोन दिवसांपासून बेपत्ता होते आणि त्यांचा शोध सुरु होता. दरम्यान, NDRF च्या पथकाला नीरा नदीपात्रात शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. घोरपडेंची आत्महत्या की हत्या आता या प्रकरणाचं गुढ वाढलं आहे.

पणन विभागात कार्यरत सहसंचालक शशिकांत घोरपडे बुधवारी बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार शिरवळ पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपास करत असताना घोरपडे यांचे शेवटचे लोकेशन शिरवळ येथे दिसून आले होते. सातारा-पुणे महामार्गावर असलेल्या शिंदेवाडी या महामार्गालगत असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये शशिकांत घोरपडे नीरा नदीवरील पुलाकडे जाताना दिसत होते. तसेच त्यांची गाडी पुलाजवळ आढळून आली. त्यानंतर शशिकांत घोरपडे यांनी आत्महत्या केली असावी, या अंदाजाने पोलिसांनी नदीपात्रात शोध सुरू केला. शशिकांत घोरपडे यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एनडीआरएफच्या जवानांची मदत घेतली. काही वेळापूर्वी सातारा-पुणे हद्दीवर नीरा नदीच्या पात्रात घोरपडे यांचा मृतदेह रेस्क्यू टीमला आढळून आला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago