सातारा

पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सज्ज ठेवा – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

सातारा : जिल्ह्यातील डोंगरी भागात जास्त पाऊस होतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे तात्पुरते स्थलांतर शाळांमध्ये करा. याबरोबरच सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

शासकीय विश्रागृहात आयोजित जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सं. गो. मुंगीलवार, जिल्हा चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, आपत्ती हाताळण्यासाठी पोलीस विभागाने जास्तीत जास्त होमगार्डची मागणी करावी. अतिवृष्टीमुळे रस्ते वाहून गेल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत होते. यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी. आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन घ्यावा. अतिवृष्टीने विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास तो सुरळीत करण्यासाठी महावितरणने आपली पथके प्रत्येक तालुक्यात सज्ज ठेवावीत, अशाही सूचना त्यांनी केल्या. बैठकीनंतर शिक्षण विभागामार्फत राबविण्यात आलेला नाविन्यपूर्ण प्रकल्प (सांगली पॅटर्न) पाटण विधानसभा मतदारसंघात राबविण्याबाबत देसाई यांनी माहिती घेतली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago