Maharashtra Will Be Unlocked In Five Levels Order Issued
सातारा : सातारा जिल्हा चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट झाला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चौथ्या स्तरामधील निर्बंध लागू केले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी काढले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार हे निर्बंध लागू असतील. तसेच शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जिल्ह्यात पूर्णतः संचारबंदी पुढेही सुरू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मटन, चिकन, अंडी, मासे विक्री दुकाने, कोल्ड स्टोरेज, गोदामे, रुग्णालय, निदान केंद्रे, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध दुकाने, औषधी कंपन्या, वैद्यकीय उपकरणे विक्रीची दुकाने, सेबीच्या नियंत्रणातील सर्व कार्यालये, भारतीय रिझर्व बँकेने नियुक्त केलेल्या सर्व सेवा, विद्युत आणि गॅस पुरवठा, पेट्रोल पंप, पेट्रोलियम संबंधी उत्पादने, सर्व प्रकारच्या वित्तसंस्था, वृत्तपत्रे यांना परवानगी राहणार आहे.
साताऱ्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…