महाराष्ट्र

नात्याला काळीमा फासणारी घटना, पोटच्या पोरानेच केला आईवर बलात्कार, जीवे मारण्याची धमकी…

सातारा : पोटच्या पोरानेच बलात्कार केल्याची तक्रार करण्याची वेळ मातेवर आली आहे. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात कुडाळपासून जवळच असलेल्या पानस पुनर्वसन येथे आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. व्यसनी मुलाने आपल्या ५५ वर्षांच्या आईवरच बलात्कार केला आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, जावली तालुक्यात कुडाळपासून जवळच असलेल्या पानस पुनर्वसन येथे जुलै महिन्यात रात्री ११ वाजता मुलाने दारूच्या नशेत आपली आई किचनमध्ये काम करत असताना मागून येऊन मिठी मारली आणि आईला फरशीवर खाली पाडून तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. कोणाला काही सांगू नको, नाही तर तुला जीव मारून टाकीन अशी धमकी दिली. पीडित आईने मेढा पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल झालेल्या त्या नराधम मुलाचे नाव आनंदा मारुती सणस असे आहे. पोलिसांनी या नराधम मुलाला अटक केली आहे. न्यायालयाने सात ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

5 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 महिने ago