महाराष्ट्र

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद, दानवेंच्या गंभीर आरोपांवर फडणवीसांचं उत्तर

नागपूर : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही उमटले. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करताना “राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष या हत्येत सहभागी आहे” असा थेट आरोप केला. तसेच राष्ट्रवादीशी संबंधित बीड जिल्ह्यातील मंत्रीही संपर्कात आहेत, असेही दानवे म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना अटक करण्याचं आश्वासन देत, कुठल्याही मंत्र्याकडे बोट न दाखवण्याचं आवाहन केलं.

अंबादास दानवे म्हणाले कि, मस्साजोग येथील सरपंचाला ज्या पद्धतीने मारहाण झाली, ती पाहिली तर हृदयालाही पीळ येईल. यात सहा आरोपी आहेत, दुर्दैवाने सांगावं लागेल की राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्षही यात सहभागी आहे, तीनच आरोपी पकडले आहेत, तिघे फरार आहेत.

दानवे यांनी इतर काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. गुन्हा घडल्यानंतर ‘बाप तो बाप रहेगा’ असं पोस्टर पोलीस स्टेशनसमोर लावलं गेलं. गुन्हेगार जर खून करुन असं म्हणत असेल, तर त्यांचे सीडीआर तपासावेत. कोणी कोणी यांना फोन केला, कोणकोणत्या राजकीय पक्षांशी ते संबंधित आहेत. दानवे यांनी आरोप केला की, बीड जिल्ह्यातील एक मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे आणि आरोपींना फोन करून मदत केल्याचे लोक सांगतात. त्यांनी मागणी केली की आरोपींवर त्वरित कारवाई केली जावी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली कि, बीड जिल्ह्यातील मस्साजोगला घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. एका तरुण सरपंचाचा निर्घृण प्रकारे खून करण्यात आला. तीन आरोपींना अटक केलेली आहे, काही अद्याप फरार असले, तरी त्यांना शोधून काढून निश्चितच अटक करु. मी विरोधीपक्ष नेत्यांना सांगू इच्छितो, की आरोपी कुठल्या पक्षाचा आहे, जातीचा किंवा धर्माचा आहे, कोणती भाषा बोलतो, कोणाशी संबंधित आहे, असा विचार न करता, जो खरोखर घटनेत सहभागी असेल, त्यावर कारवाई केली जाईल, यासाठी ही केस सीआयडीला ट्रान्सफर केली आहे. एसआयटी चौकशी करायला सांगितलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले कि, माझी विनंती आहे, हे सर्वोच्च सभागृह आहे. इथे जेव्हा आपण बोलतो, तेव्हा ते १४ कोटी जनतेपर्यंत जातं. ज्यावेळी आपण मंत्र्यांच्या जवळचे वगैरे बोलतो, त्यावेळी विनाकारण ज्यांचा सहभाग नसतो, त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश होतो, आरोपीला वाचवा असा सरकारवर कोणाचाही दबाव नाही. जे आरोपी निष्पन्न होतील, आम्ही तांत्रिक आणि एआयच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी शोधून काढतो. मी आश्वस्त करु इच्छितो, की कुणीही गुन्हेगार असो, त्यांना सोडणार नाही. ज्या पोलिसांनी जाणीवपूर्वक यात कामचुकारपणा केला, त्यांच्यावर कारवाई झाली आहे, अजून कोणी सहभागी सापडला तर कारवाई केली जाईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago