महाराष्ट्र

कोल्हापूरहून पंढरपूरला निघालेले, सांगलीत विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची बोलेराला धडक, ७ जण ठार

सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी येथे भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झाले आहेत.रत्नागिरी – नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला आहे.मृतांमध्ये ३ महिला,३ पुरुष आणि १२ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.बोलेरो गाडीतील मृत हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे,हे सर्व जण एकाच गाडीतून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते. अपघातातील मृत हे कोल्हापूर जिल्ह्यातील सरगडे माळवाडी गावातील असल्याची माहिती समोर आली आहे.

मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी- नागपूर माहमार्गावरील वड्डी गावाच्या हद्दीत बोलेरो गाडी पोहोचली असता ,राँग साईडने विटांनी भरलेला ट्रॅक्टर अचानक समोर आला. तर, भरधाव वेगात असणारी बोलेरो गाडी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली,ज्यामध्ये गाडीचा चक्काचूर होऊन ७ जण जागीच ठार झाले आहेत,तर १ तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी मिरज पोलीस दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर महामार्गावर मिरज जवळील वड्डी गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. बोलेरो आणि ट्रॅक्टरच्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोल्हापूरहून पंढरपूरला जाणाऱ्या कुटुंबावर काळानं घाला घातला आहे. विटानं भरलेला ट्रॅक्टर चुकीच्या दिशेनं आल्यानं दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून १ जण जखमी झाला आहे. बोलेरो गाडी मधील प्रवासी सर्वजण कोल्हापूरहून पंढरपूरच्या दिशेने चालले होते. मिरज जवळील वड्डी गावाजवळील हायवेवर भीषण अपघात झाला. चुकीच्या साईडहून विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरनं बोलेरोला धडक दिली. ट्रॅक्टर आणि बोलेरो गाडीच्या भीषण अपघातात ७ जण ठार झाले असून मिरजेच्या वड्डी येथील महामार्गावर हा अपघात घडला. या मार्गावरुन वाहतूक सुरु झाल्याचा आजचा पहिलाच दिवस होता. महामार्गावर दिशादर्शक फलक लावले नसल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago