महाराष्ट्र

‘भूमित्र’ चॅटबॉटच्या माध्यमातून महसूल सेवा लोकांपर्यंत जलदगतीने पोहोचतील

मुंबई : तंत्रज्ञानाचा वापर करून भूमी अभिलेख व्यवस्थापन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची सुरुवात केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मंत्रालयात या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. ही सेवा नागरिकांना महसुलच्या सेवा अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

त्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. २००२ पासून ७/१२ संगणकीकरण, मिळकत पत्रिका संगणकीकरण, भूमी नकाशांचे संगणकीकरण, तसेच भू-संदर्भीकरण यांसारखी पायाभूत कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात विभाग यशस्वी झाला आहे. आता ही अद्ययावत सेवा लोकांना नक्कीच फायदेशीर ठरेल असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.

सातबाराच्या संबंधित अनेक प्रश्नांवर शेतकऱ्यांना या चॅटबॉटच्या माध्यमातून उत्तरे मिळणार आहेत. भविष्यात या सेवेमध्ये एआयचा वापर करता येईल का याबाबतही माहिती घेतली जात आहे. तसेच संकेतस्थळाशिवाय व्हॉट्सॲपवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी यावेळी सांगितले.

‘महाभूमी’ संकेतस्थळावर ७/१२, ८-अ, ई-चावडी, ई-हक्क, फेरफार अर्ज स्थिती, पीक पाहणी, आणि महा भू-नकाशा यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत. तसेच, नागरिक या संकेतस्थळावर ७/१२ पाहू शकतात, ७/१२ डिजिटल स्वाक्षरी केलेला मिळवू शकतात आणि फेरफार अर्जाची स्थिती तपासू शकतात.

डिमिस्टिफायिंग लँड रेकॉर्ड्स’ (भूमी अभिलेखांचे गूढ उकलणे) या संकल्पनेअंतर्गत ही ‘भूमित्र’ चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा माहिती, सुविधा आणि सूचना या तीन तत्त्वांवर आधारित आहे. ‘भूमित्र’ चॅटबॉटमध्ये जमीन व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी २७३ प्रश्नांचा संच तयार करण्यात आला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago