Maharashtra Ganeshotsav Mandal Competition 2025 Results | Tiranga Mandal Vita Wins First Prize
मुंबई : महागणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य उत्सवअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या, ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चा निकाल जाहीर झाला असून सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील ‘तिरंगा गणेशोत्सव मंडळा’ने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर लातूर येथील ‘वसुंधरा वृक्षारोपी गणेशोत्सव मंडळा’ने द्वितीय, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील ‘सुवर्णयोग तरुण मंडळा’ने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
यासोबतच जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांची घोषणा करण्यात आली असून तालुकास्तरापर्यंत विस्तारित केलेल्या या स्पर्धेअंतर्गत विजेत्या तालुकास्तरीय मंडळांची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून या समारंभात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते विजेत्या मंडळांचा पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी अभिनंदन केले आहे.
शासन निर्णय : राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…