महाराष्ट्र

लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याची नोंद

पुणे : व्यसनमुक्ती विषयावर अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याची दखल ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने घेतली आहे. व्यसनमुक्तीवर प्रचार, प्रसार, प्रबोधनाचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गिते यांच्या नावावर विक्रम नोंदवण्यात आला आहे. या संस्थेकडून त्यांना सन्मानचिन्ह, ट्रॉफी, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले आहे.

सध्याची तरुणाई ही विचारांनी समृद्ध आहे. तरुण पिढी उज्वल भविष्याचा आधार मानली जाते. परंतु हीच तरुणाई काही प्रमाणात व्यसनाच्या अधीन झाली आहे. त्यामुळे देशाचे भविष्य कुठेतरी अंधारात जाताना दिसत आहे. भारत हा सर्वात जास्त तरुण पिढी असलेला देश आहे. देशातील तरुण पिढीकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहे. या तरुण पिढीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी अनेक लोक काम करत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे डॉ. सोमनाथ गिते. गिते यांनी व्यसनमुक्तीसाठी जनजागृती केली आहे. डॉ सोमनाथ गितेंच्या कामामुळे आज कित्येक तरुण व्यसनापासून लांब गेले आहेत.

यापूर्वी त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची आणि या क्षेत्रातील त्यांनी केलेल्या अभ्यासाची दखल घेत विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२३ (IBR), लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड (UWR), इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थांनी कार्याची दखल घेऊन विक्रमाची नोंद केलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासन आणि अन्य संस्थांचे व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवादूत, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलेले आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, स्व. मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, वर्षा विद्या विलास यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago