महाराष्ट्र

आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे, राज्यपालांना परवानगी नाकारल्याने उमटल्या प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांना विमानातून उतरुन परत राजभवनावर यावं लागलं.

मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारली, विमानात बसलेल्या राज्यपालांना खाली उतरावं लागलं

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया :

देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं कि, “हा सगळा प्रकार दुर्दैवी आहे. कुणाची खासगी मालमत्ता नाही. राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अपॉईंट करतात. राज्यपालांना कुठे जायचं असेल तर ते GAD ला पत्र लिहितात, ते त्याबाबत ऑर्डर काढतात. मी माहिती काढली, कालच GAD ला परवानगी दिली होती. मुख्यमंत्र्यांपर्यंतही हे पत्र पोहोचलं. पण तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या इतिहासातलं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं, आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे, राज्यपाल संविधानिक पद आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया :

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, “राज्यपाल प्रकरणावर मला काहीही माहिती नाही. मला आत्ताच याबद्दल कळालं. मी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सांगेन. काय नक्की घडलं हे पूर्ण माहिती झाल्याशिवाय सांगता येणार नाही.”

प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया :

प्रवीण दरेकर यांनी घणाघाती टीका करत म्हटलं कि, “सूडभावनेचा अतिरेक झालाय. एव्हढं सूडभावनेने वागणारं सरकार आजपर्यंत पाहिलं नाही. राजकारण आणि सूडभावना समजू शकतो. पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे, त्याची गरिमा राखली पाहिजे. मात्र सूडभावना किती नसानसात भरली आहे, हे ठाकरे सरकारने दाखवून दिलं आहे. सगळ्या प्रथा, परंपरा या सर्वांना हरताळ भासण्याचं काम या सरकारने केलं.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया :

राज्यपालांना अद्यापही महाराष्ट्र सरकारचे विमान वापरण्याची परवानगी दिली नव्हती. त्यांनी परवानगी मागितली होती. पण ते विमान उड्डाणास सक्षम आहे की नाही यासंदर्भात पुरेपूर माहिती नव्हती. त्यामुळे कदाचित परवानगी दिली नसेल. परवानगी नसताना तांत्रिकदृष्ट्या प्रवास करणे योग्य नाही. मी अधिक माहिती नक्की घेईन. आम्ही महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांचा नेहमीच आदर केला आहे. त्यांचा अवमान कदापिही होणार नाही, असं शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago