रत्नागिरी

दापोलीत दोन बसची समोरासमोर धडक, विद्यार्थ्यांसह 25 प्रवासी जखमी, एक बस चालक गंभीर जखमी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत आज (२५ ऑगस्ट) सकाळी दोन एसटी बसचा भीषण अपघात झाला. दोन बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एक बस चालक गंभीर जखमी झाला आहे. एका एसटीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

बोरिवली – दापोली एसटी दापोलीकडे येत असताना दापोलीकडून मुरतपूरकडे जाणाऱ्या बसची मौजे दापोली वळणावर समोरासमोर धडक झाली. दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे एका एसटीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात शाळेत जाण्यासाठी निघालेले विद्यार्थीदेखील जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago