महाराष्ट्र

दुर्दैवी घटना! धबधब्यात आंघोळ करणं जीवावर बेतलं, तरुणाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : पावसाळ्याच्या दिवसात धबधब्यावर जाताना पर्यटकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही धोका न पत्करता पावसाळी पर्यटनाचा आनंद घेणे तसेच स्थानिकांच्या सूचनांचे पालन करणे हे आवश्यक आहे. कोकणात लांजा येथे धबधब्यावर अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्या कळसवली राजापूर येथील एक तरुण बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रथमेश दत्ताराम तळेकर (वय २५, तळेकरवाडी कळसवली ता. राजापूर) असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

कळसवली राजापूर येथील सात ते आठ तरुण मुंबईहून गावी आले होते. आजही तरुण मंडळी वेरवली बेर्डेवाडी धरणाच्या धबधब्याजवळ आंघोळ करत होते. धबधब्यात आंघोळ करताना एक जण पाय घसरून बुडाला उशिरापर्यंत पाण्यातून वरती न आल्याने इतर तरुणांची धावपळ झाली. सुमारे दोन तासांनी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. वेरवली बुद्रुक येथील प्रभाकर कुलये पोलीस पाटील यांना या घटनेची माहिती देण्यात आली. लांजा पोलीस निरीक्षक मारुती आटकुडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

सायंकाळी चार वाजता मृतदेह धबधब्याच्या डोहातून बाहेर काढून लांजा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला. वेरिवली बेर्डेवाडी धरणाचे वाढीव पाणी सांडव्यातून सोडण्यात आल्याने धबधबा कार्यान्वित झालेला आहे. हा धबधबा अतिशय धोकादायक आहे. या धबधब्याकडे न जाण्याचे आदेश आहेत, तरीही बरेच तिथे जाण्याचं धाडस करत आहेत. बुडून मृत्यू झालेल्या तरुणांमधील अन्य तरुणे हे या ठिकाणी मौजमस्ती करत असल्याचं येथील ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक श्री मारुती अटकुटे करत आहेत.

वेरवली गावचे पोलीस पाटील आणि सरपंच यांनी येणाऱ्या पर्यटकांना सूचना केली होती की, अतीउत्साहाच्या भरात जास्त खोल असणाऱ्या पाण्यात पुढे जाऊ नका. मात्र पर्यटक सुचनेकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्या पावसाळा असल्याने धरणाच्या पाण्याचा दाब वाढला आहे. त्यामुळे धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी. या दुर्दैवी घटनेने राजापूर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago