Rapid upliftment of the state if women become self-sufficient
मुंबई : महिला स्वयंपूर्ण झाल्या तर राज्याची जलद गतीने उन्नती होण्यास मदत होणार आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करणे गरजेचे आहे असे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ाती अभियान अर्थात एमएसआरएलएमच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
योजनांविषयी जागृती करा
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत असणाऱ्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचवा. त्याविषयी महिलांना माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांचे कार्यक्रम घेऊन त्यांना योजनेविषयी जागृत करण्याच्या सूचना राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी दिल्या. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटात कार्यक्रम घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी एमएसआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, अवर सचिव माळी आदी उपस्थित होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…