महाराष्ट्र

ट्रेनमध्ये घुसलेल्या दरोडेखोरांकडून तरुणीवर बलात्कार, इगतपुरी ते कसारा स्थानकादरम्यानची घटना

कल्याण : इगतपुरी ते कसारा स्थानकादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दरोडेखोरांनी १५ त २० प्रवाशांची लूटमार केली आणि ट्रेनमध्ये असणार्‍या वीस वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी स्थानकातून ट्रेन निघाली आणि बोगद्याजवळ ट्रेन स्लो होते. यावेळी सात-आठ जण ट्रेनमध्ये घुसले. या चोरट्यांनी १५ ते २० प्रवाशांकडून पैसे आणि मोबाइल हिसकावून घेतले. त्यांना बेदम मारहाण केली. अनेक प्रवासी यामध्ये जखमी झाले आहेत. या दरम्यान चोरट्यांनी एका महिलेची छेड काढली तर एका २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून रेल्वेमध्ये ही अशा घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago