महाराष्ट्र

राजू शेट्टी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल, गेल्या महिन्यात केली कोरोनावर मात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब वाढला असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आलं.

राजू शेट्टी यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांना ९ सप्टेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनावर मात केल्यानंतर आठवड्याभराने ते घरी परतले होते. कोरोनामधून बरे झाल्यानंर राजू शेट्टींनी विश्रांती घेतली होती. मात्र गेल्या महिन्याभरापासून ते पुन्हा शेतकरी प्रश्न घेऊन राज्यभर दौरा करीत आहेत. अलीकडे झालेल्या अतिवृष्टीनंतर त्यांनी राज्यात दौरा करून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना प्रती हेक्‍टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी केली होती.

गेले दोन दिवस ते शेतकरी प्रश्नांसाठी दिल्ली येथे आंदोलनात सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी ते पुण्यात दाखल झाले. सकाळी त्यांचा रक्तदाब वाढल्याने आणि दम लागत असल्यामुळे त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली. त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजू शेट्टी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे काही कारण नाही, असे निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago