महाराष्ट्र

कोरोनाला हरवण्यासाठी आता ‘मिशन कवच कुंडल’, राज्य सरकारची मोठी घोषणा

मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे, या पार्श्वभूमीवर ‘मिशन कवच कुंडल’ हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली.

उद्यापासून सात दिवस म्हणजेच ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या सप्ताहात राज्यात ‘मिशन कवच कुंडल’ राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत राज्यात दररोज किमान १५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. ‘कोविड लसीच्या उपलब्धतेची परिस्थिती आता बदलली आहे. पूर्वीसारखा लसींचा तुटवडा नाही. आज या क्षणाला राज्याकडं लसीचे जवळपास ७५ लाख डोस आहेत. आणखी २५ लाख डोस आज मिळणार आहेत. येत्या सहा दिवसांत हा साठा संपवायचा असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे,’ असं टोपे म्हणाले.

‘येत्या दसऱ्यापर्यंत देशात १०० कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य केंद्र सरकारनं ठेवलं आहे. राज्य सरकारनं प्रयत्न केल्यास केंद्र सरकारला हे लक्ष्य गाठण्यास मदत होईल. केंद्र सरकारनंही राज्याकडून तशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं जय्यत तयारी केली आहे. लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र कमी पडलेला नाही. यापुढंही तो कमी पडू नये हाच सरकारचा प्रयत्न आहे,’ असं टोपे म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 महिने ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago