महाराष्ट्र

‘या’ तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता…

पुणे : देशभरात आत्तापर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत आठ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. वायव्य, ईशान्य आणि पूर्व भारतामध्ये अनेक ठिकाणी पावसाची तूट आहे. २१ ऑगस्टपर्यंत मान्सूनचा पाऊस वायव्य आणि मध्य भारतात बरसेल, असा अंदाज आहे. यासोबतच ऑगस्ट अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

काल (गुरुवारी) वर्तवण्यात आलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार २६ ऑगस्टनंतर कोकणासह राज्यात पाऊसमान सुधारण्याची अपेक्षा आहे. २० ते २६ ऑगस्ट या कालावधीत मात्र कोकणात जास्त पाऊस नसेल. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पाऊस अपेक्षित आहे. २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर तसेच २ सप्टेंबरनंतर पावसाचे प्रमाण वाढू शकते. महाराष्ट्रामध्ये सध्या सरीसरीहून सात टक्के पाऊस अधिक नोंदवला गेला आहे. आत्तापर्यंत राज्यात ७२८ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ७७७ मिलीमीटरपर्यंत पाऊस नोंदला गेला आहे.

राज्यात पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमधील तुरळक ठिकाणांचा समावेश आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वायव्य महाराष्ट्र, बिहार येथे हळुहळू पावसाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. १९ ते २३ ऑगस्ट दरम्यान बिहार, पूर्व उत्तर प्रदेश येथे २३ ऑगस्टपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. यात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसेल. पुढील दोन दिवसांमध्ये मध्य भारत आणि नजीकच्या दक्षिण भारतामध्येही पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथे २१ ऑगस्टपर्यंत सर्वदूर पाऊस असेल. यातही तुरळक ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे.

कोकणात सात टक्के, मध्य महाराष्ट्रात आठ टक्के, मराठवाड्यात १८ टक्के पाऊस आत्तापर्यंतच्या सरासरीच्या अतिरिक्त आहे. तर विदर्भात नऊ टक्क्यांची पावसाची तूट आहे. विदर्भातील चार जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट आणि सप्टेंबर अखेरीस पडणारा पाऊस दिलासा देईल, अशी अपेक्षा आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago