महाराष्ट्र

राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

राज्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असून आज तिसरा व शेवटचा दिवस आहे. मागील दोन दिवसांमध्ये जवळपास सर्व आमदारांनी शपथ घेतली आहे. आजच्या अधिवेशनात राहुल नार्वेकर यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षपदासाठी घोषणा करण्यात येणार आहे. त्यांनी कालच या पदासाठी अर्ज दाखल केला होता, आणि त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

दुसरीकडे, राज्यात महाविकास आघाडीकडून ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचं बेळगाव येथे महाअधिवेशन होणार आहे. मात्र, कर्नाटक पोलिसांनी या अधिवेशनाला परवानगी नाकारली आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिवेशन घेण्यावर ठाम भूमिका घेतली आहे, ज्यामुळे कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago