मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय गाडे याच्या विरोधात यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याची ओळख आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेत पोलिस तपासाची गती वाढवली आहे. सध्या पोलिस आरोपीला अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याच्याविरुद्ध शिक्रापूर आणि शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वारगेट एसटी स्थानकावर घडलेली ही घटना महिला सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते. विशेषतः, ज्या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते, त्या ठिकाणी असे धक्कादायक प्रकार घडणे ही चिंता वाढवणारी बाब आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिह्न निर्माण झाले आहे. महिला सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, तसेच सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे. या घटनेनंतर, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी अधिक कठोर नियम आणि उपाययोजना आवश्यक होईल.