पुणे

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, देहू संस्थानच्या दोन विश्वस्तांसह एक नगरसेवकाला जुगार खेळताना अटक

पिंपरी चिंचवड : खेड तालुक्यातील येलवाडी येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देहू संस्थानाचे दोन विश्वस्त, देहू नगरपंचायतीचे एक नगरसेवक आणि एका राजकीय पदाधिकारी असलेल्या महिलेच्या पतीसह २६ जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून एकूण ३५ लाख १० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकातील पोलीस नायक आशिष ज्ञानदेव बनकर यांनी याप्रकरणी म्हाळूंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये देहू संस्थानचे विश्वस्त संतोष गुलाब मोरे, विशाल केशव मोरे तर देहू नगरपंचायतीचे नगरसेवक आदित्य चिंतामणी टिळेकर यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगाव ते येलवाडी रोडच्या उजव्या बाजूस एस.एच.ई.पी.एल. हेव्ही इंडस्ट्रिअल फॅब्रिकेशन लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर जुगार अड्डा चालवला जात असल्याची माहिती दरोडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, बुधवारी पहाटे या ठिकाणी छापा मारण्यात आला. यावेळी २६ जण तीन पत्त्यांचा जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींकडून दोन मोटारी, १८ दुचाकी, मोबाईल असा ३५ लाख १० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शेखर गुलाब परंदवाड (वय ५०, रा. देहूगाव), विशाल प्रतापसिंह परदेशी, संतोष केशव टिळेकर, संतोष शांताराम कडूसकर, विशाल पोपट काळोखे, मारुती भीमाजी वाळुंज, अमित अमृत नलावडे, अनिल नागनाथ वाघमारे, विनायक विक्रांत गाडे, संदीप रंगनाथ आव्हाड, राहुल गुलाब येवले, विश्वास दत्तू भिंगारदिवे, राहुल सुभाष कुऱ्हाडे, विजय गोपाळ पडवळ, अमोल युवराज बोरसे, मयूर चंद्रमणी घनवट, योगेश केशव मोरे, सचिन बापू खरात, नवनाथ दशरथ टिळेकर, अप्पा बाळू लोखंडे, मोहम्मद दाऊद सय्यद, मोहन सहादू लोखंडे, भारत नानासाहेब विधाते अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago