पुणे

खंडाळ्याजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन ठार, अनेक जण जखमी

पुणे : खंडाळा जवळील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी (२० एप्रिल) रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्रमांक – GJ 03 BT 6701) मागून इनोव्हा कारला (MH 19 BG 8067) जोरदार धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रकच्या धडकेनंतर इनोव्हा कार समोरच्या लेनमध्ये जाऊन दुसऱ्या वाहनाला धडकली, ज्यामुळे साखळी अपघात घडून आला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून इतर सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये प्रिया सागर इंगुळकर, नीलेश संजय लगड (वय ४२) आणि त्यांची १२ वर्षांची मुलगी श्रावी नीलेश लगड यांचा समावेश आहे. हे तिघेही पुण्यातील सदाशिव पेठेतील गिरिजाशंकर अपार्टमेंटचे रहिवासी होते.

दरम्यान, या प्रकरणी सागर पांडुरंग इंगुळकर (वय ४०), हे तक्रारदार असून त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. इंगुळकर हे अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांपैकी एक आहेत. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५, ३२४ (४)(५) आणि मोटार वाहन कायदा कलम १३४(अ)(ब), १८४ अंतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात ट्रक चालकाचा शोध सुरू केला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण आणि दोषी कोण याचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी मदतकार्य वेळीच पोहोचल्याने आणखी जीवितहानी टळली, असे पोलिसांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago