The decision to start schools from 1st to 7th classes has been postponed
पुणे : राज्य सरकारने राज्यात कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. त्यानुसार सर्व तयारी देखील सुरु होती. मात्र, दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा ओमिक्रॉन नावाचा नवा व्हेरिएंट आढळल्यानंतर आता शाळा सुरू करण्याच्या निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे.
राज्य सरकारने सुरुवातीला १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे महानगर पालिकेने १ डिसेंबरपासून शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगर पालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं कि, “पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत सुरु करण्यात येणार नाहीत. यासंदर्भात सविस्तर विचार करून निर्णय घ्यावा लागेल. आपल्याकडे लहान मुलांसाठी अजूनही लस आलेली नाही. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून शाळा सुरु करण्याचा निर्णय १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. त्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. याबाबत महापालिका क्षेत्रातील पालक संघटनांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ.”
मुंबई महानगरपालिकेने देखील १ डिसेंबरपासून शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पालिकेच्या हद्दीतील शाळा आता १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.
मुंबई-पुण्यापाठोपाठ नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय देखील १० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्याचं नाशिक महानगर पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…