पुणे

पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, एका महिलेची सुटका, आरोपीला अटक

पुणे : स्पा सेन्टरच्या नावाखाली एका महिलेला वेश्याव्यवसायास भाग पाडल्याच्या आरोपाखाली पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी पथकाने रहाटणीतील कोकणे चौक परिसरातील एका स्पा सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत पीडितेची सुटका करण्यात आली असून, पुण्यातील दत्तवाडी येथील रहिवासी ओंकार विनायक जोशी (वय २६) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्पा सेंटर चालवत असताना महिलेला पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलत होता. याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मानव तस्करी विरोधी पथकाने छापा टाकून पीडितेला सुरक्षितरीत्या बाहेर काढले.

या प्रकरणी आरोपीच्या एका साथीदाराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानव तस्करी विरोधी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल नीलम बुचडे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र धुमाळ करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago