पुणे

पुण्यातील दोन उच्चभ्रू स्पावर पोलिसांचा छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, १० थाई महिला व २ अल्पवयीन मुलींसह १८ जणींची सुटका

पुणे : पुणे पोलिसांनी शहरातील विमाननगर व बाणेर येथील दोन उच्चभ्रू स्पावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १८ महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यामध्ये १० थाई नागरिक, दोन अल्पवयीन भारतीय मुली (वय १५ व १७ वर्षे) यांचा समावेश आहे. संबंधित स्पा केंद्रांत कायदेशीर मसाज पार्लरच्या आड मानवी तस्करी व वेश्याव्यवसायाचे धंदे सुरु असल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी गुप्त माहितीनंतर विमाननगर परिसरातील स्पावर धाड टाकली. यावेळी १६ महिलांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये बहुतेक थाई महिला तसेच दोन अल्पवयीन मुलींनाही वेश्याव्यवसायात ढकलल्याचे आढळून आले. या मुलींना नोकरीचे आमिष दाखवून फसवण्यात आले होते.

बाणेर परिसरातील एका स्पावर दुसरी धाड टाकण्यात आली. तेथूनही दोन महिलांची सुटका करण्यात आली. दोन्ही ठिकाणच्या कारवायांमध्ये संबंधित स्पा मालक, व्यवस्थापक व मालमत्ता मालकाला अटक करण्यात आली आहे.

मानवी तस्करीचा गंभीर प्रकार
प्राथमिक तपासात खोट्या रोजगाराच्या आश्वासनांवर महिलांना व मुलींना पुण्यात आणून जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलींचे भावनिक व आर्थिक शोषण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक आशालता खापरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे ही धाडसत्रं आखण्यात आली होती.

विमाननगर पोलिसांनी याप्रकरणी संबंधितांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांचा तपास सुरु असून, या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

शहरातील स्पा व्यवसायावर प्रश्नचिन्ह
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पुण्यातील बेकायदेशीर स्पा आणि त्याआड चालणाऱ्या अनैतिक कारवायांवर प्रकाश पडला आहे. मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या घटना चिंतेचा विषय ठरत असून, पोलिसांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago