पुणे

पुण्यात स्पा सेंटरच्या आड सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

पुणे : कल्याणी नगरमधील स्पा सेंटरच्या आड चालणाऱ्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून कथित सूत्रधार सध्या फरार आहे. येरवडा पोलिस स्टेशन आणि पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या संयुक्त कारवाईत हा प्रकार समोर आला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई शुक्रवारी १६ मे रोजी कल्याणी नगर येथील ‘गुडविल एन्क्लेव्ह’मध्ये स्थित ‘निद्रा बॉडी स्पा’ येथे छापा टाकून करण्यात आली. छाप्यादरम्यान स्पामधून तीन महिलांची सुटका करण्यात आली. संबंधित महिलांना आर्थिक लाभाचे खोटे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे हर्षवर्धन सिंग भरत मोदासिया (२२, रा. कोरेगाव पार्क) आणि असफुल इस्लाम मुजीबुर रहमान (२३, रा. नागाव, आसाम) अशी आहेत. त्यांना शनिवारी पहाटे ३:१० वाजता ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि स्पाचा मालक जुनैद फारुख शेख याचा शोध सुरु आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मयुरी नलावडे यांनी फिर्याद दिली असून, आरोपींनी महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या नकळत आणि जबरदस्तीने वेश्याव्यवसायात सहभागी केले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा, १९५६ अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम १४३ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

छाप्यादरम्यान पोलिसांनी १५,००० रुपये रोख, १०,००० रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि कंडोम जप्त केले. या प्रकरणाचा तपास येरवडा पोलीस करत आहेत. सूत्रधाराच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago