Selection of Chetan Jedhe as District Vigilance and Control Committee Member
पुणे : राजेश देशमुख जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये चेतन जेधे यांची निवड जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सदस्य म्हणून करण्यात आली आहे.
या समिती मध्ये जिल्हातील राज्यसभा व लोकसभा सदस्य शरद पवार, प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे, गिरीश बापट, श्रीरंगअप्पा बसणे, अमोल कोल्हे तसेच जिल्ह्यातील विधानसभा सदस्य आजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री पुणे जिल्हा), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते, संजय जगताप, संग्राम थोपटे, अशोक पवार, सुनिल शेळके हे सर्व लोकप्रतिनिधी जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सदस्य असुन, चेतन जेधे यांची निवड जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सदस्य म्हणून करण्यात आली आहे.
चेतन जेधे उच्च शिक्षित असुन त्यांनी एम बी ए, एम एस्सी लंडन येथुन केली आहे. जेधे हे सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या अतकरवाडीचे असुन त्यांच्या निवडीमुळे जिल्हा स्तरावरुन व राष्ट्रवादी पक्ष स्तरावरुन त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा चा वर्षाव केला जात आहे. तसेच अतिशय महत्त्वाचा व संवेदनशील विषय असणाऱ्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी असताना चेतन जेधे हे त्यांच्या पदास योग्य न्याय देतील, अशा प्रतिक्रिया देखील अनेकजण देत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…