पुणे

कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी (दि. १५ जून) जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत ४ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तथापि, घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले.

घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी या ठिकाणी २५ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील जागेवर पोहोचून काही हायड्रा मशीन जागेवर मागवल्या. सर्व पथकांनी ने एकत्रित येऊन काम चालू केले. स्थानिक नागरीकांनीही जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. या ठिकाणी किमान २५० स्वयंसेवक काम करत होते.

प्रथम जे लोक जिवंत आहेत त्यांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. तळेगाव येतील ग्रामीण रुग्णालय, अथर्व हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, बडे हॉस्पिटल येथे जखमींना दाखल करण्यात आले आहे. आज अखेर 35 जखमी रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले असून, 11 जखमी रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

अतिदक्षता उपचारांची गरज असलेल्या जखमींना तत्काळ आयसीयूमध्ये हलविण्यात आले. आयसीयूमधील रुग्णांची काल रात्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली व डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्यासाठी सूचना दिल्या.

कुंडमळा येथील घटनास्थळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनिल शेळके यांनी भेट देऊन माहिती घेतली व सर्व यंत्रणंना तात्काळ मदतीच्या सूचना दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी घटनास्थळी उपस्थित होते.

कालपासून आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. कोणत्याही पर्यटकाची हरवल्याबाबत तक्रार आज सांयकाळपर्यंत प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शेवटी आज सायंकाळी 6 वाजता बचावकार्य थांबविले असल्याची माहिती मावळचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली आहे. आजच्या शोध मोहिमेत वन्यजीव संस्था, आपदा मित्र, रोहा व महाड येथील आपत्ती व्यवस्थापन संस्था यांनी देखील भाग घेतला. यावेळी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, बापू बांगर, तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, अविनाश पिसाळ, पोलीस निरीक्षक रणजित जाधव आदी उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago