Student Stabbed in Private Coaching Class in Rajgurunagar, Pune; Police Launch Probe
पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे एका खासगी कोचिंग क्लासमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमके काय घडले?
प्राथमिक माहितीनुसार, वर्गात शिक्षक शिकवत असतानाच अचानक एका विद्यार्थ्याने त्याच्या क्लासमेटवर चाकूने हल्ला केला. हल्लेखोर विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्या थेट गळ्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी विद्यार्थ्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही मुलं १३ ते १४ वर्ष वयोगटातील असून 8 वी आणि 9 वी वर्गातील मुलांचा क्लास एकाचवेळी सुरु होता. त्यावेळी ही घटना घडली आहे.
दरम्यान, घटनेनंतर हल्ला करणारा विद्यार्थी दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
या धक्कादायक घटनेमुळे खासगी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्षणाच्या ठिकाणी अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने पालकांमध्येही तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…