पुणे

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; हुंडा, चारित्र्यावर संशय, जबरदस्ती गर्भपात…

पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन जवळील सोरतापवाडी येथे सासरच्या छळामुळे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीप्ती मगर चौधरी (वय अंदाजे 30) यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

या प्रकरणी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात पती रोहन चौधरी, सासू सुनिता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस तपासानुसार, दीप्ती आणि रोहन यांचा विवाह 2019 साली झाला होता. विवाहावेळी दीप्तीच्या कुटुंबीयांनी सुमारे 50 तोळे सोने दिले होते. मात्र, लग्नानंतरही सासरच्यांकडून तिच्यावर वारंवार मानसिक छळ करण्यात येत होता.

दीप्तीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता. तसेच “दिसायला सुंदर नाही”, “घरकाम जमत नाही” अशा अपमानास्पद आरोपांद्वारे तिचा सातत्याने छळ केला जात होता.

मुलीचा संसार वाचावा म्हणून दीप्तीच्या माहेरकडून एकदा 10 लाख रुपये रोख आणि वाहनासाठी तब्बल 25 लाख रुपये देण्यात आले होते. तरीही सासरच्या त्रासात कोणतीही घट झाली नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीतील सर्वात गंभीर बाब म्हणजे, दीप्ती गर्भवती असताना तिच्या पोटातील बाळ मुलगी असल्याचे समजताच, पती व सासरच्या सदस्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप आहे. ही माहिती दीप्तीने स्वतः आपल्या आईला दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आरोपी सासू सुनिता चौधरी या ऑक्टोबर 2025 मध्ये सोरतापवाडी गावाच्या सरपंचपदी निवडून आल्या होत्या, तर सासरे कारभारी चौधरी हे शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.

उरुळीकांचन पोलीस अधिक तपास करत असून, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago