women hanged herself
पुणे : पुण्यातून आत्महत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पैसे नसल्याने नवऱ्याने मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्यामुळे एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून देत प्रकरणाचा तपास सुरू केला. शिवानी गोपाल शर्मा (वय 20) असे मृत महिलेचे नाव आहे.
शिवानी गेल्या काही महिन्यांपासून पती गोपाल शर्मा यांच्याकडे मोबाईलसाठी हट्ट करत होती. गोपाल एका खाजगी कंपनीत छोटी नोकरी करतो, आर्थिक अडचणींमुळे त्याला मोबाईल विकत घेता आला नाही. मात्र पत्नीला हे समजून घेत नव्हती आणि फोन विकत घेण्याचा आग्रह धरत होती. अखेर मोबाईल नसल्यामुळे शिवानीने हे पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे. तपासानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास शिवानीने तिचा हट्ट पूर्ण होऊ न शकल्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पती गोपाल कामावरून घरी परतला तेव्हा त्याला पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी मृत महिलेच्या पतीचा जबाबही नोंदवला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…