पुणे

पुणे : अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना मोठे स्फोट होऊन भीषण आग, चार स्कूल बस जळून खाक

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ एका गॅस टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीनंतर मोठे स्फोट होऊन हवेत आगीचे लोट पसरू लागल्याने लोकांची पळापळ सुरू झाली. आगीत तीन ते चार स्कूल बस जळून खाक झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या विभागाने पुष्टी केली आहे की ताथवडेमध्ये अनधिकृतपणे प्रोपीलीन गॅसचे रिफिलिंग हे रविवारी रात्री लागलेल्या आगीचे मुख्य कारण होते. ही घटना घडली तेव्हा व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरमध्ये गॅस रिफिल करण्यात येत होता.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुपती कॅरियरचा एकूण 21 टन गॅस रिफिल केला जात होता आणि हे काम करत असलेले कर्मचारी स्फोट झाल्यानंतर घाबरून घटनास्थळावरून पळून गेल्याचा संशय आहे. एकूण 27 सिलिंडर घटनास्थळी सापडले त्यापैकी 9 चा स्फोट झाला होता आणि 8 स्फोटानंतर गळू लागले होते तर उर्वरित सिलेंडर फुटले नाहीत.

अग्निशमन दलाला रात्री ११ : 04 वाजता आपत्कालीन कॉल आला आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दल विभाग, पीएमआरडीए आणि एमआयडीसी क्षेत्रातील विविध स्थानकांतील अग्निशमन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. पिंपरी, थेरगाव, प्राधिकरण, राहटणी, चिखली, भोसरी, तळवडे, हिंजवडी, एमआयडीसी आणि पीएमआरडीए येथील बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. रात्री उशीरा कुलिंग ऑपरेशन सुरू झाले. गॅस टँकरमधून सिलिंडरमध्ये गॅस अवैधरित्या भरताना स्फोट झाला, अशी प्राथमिक माहिती आहे.

या आगीत तीन ते चार स्कूल बस जळून खाक झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूल बस जेएसपीएम कॉलेजच्या आवारात उभ्या होत्या. या सर्व बसेस गॅस इंधनावर चालत असून, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यातील तीन ते चार बसेस एकापाठोपाठ एक भडकल्या. स्फोटाचे आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू येत होते, तर धुर आणि ज्वाळांचे लोट दूरवरून दिसत होते. या भयंकर घटनेने स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावर येण्यास भाग पाडले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. रविवारी रात्री एकापाठोपाठ एक सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर नागरिकांनी भीतीने घराबाहेर धाव घेतली. तसेच भीतीचे वातावरण पसरले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago