पुणे

पुणे : पंचवटी परिसरात झाड कोसळले; वाहने अडकली, एक विद्यार्थिनी जखमी

पुणे : पुणे शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पाषाणमधील पंचवटी परिसरातही परिणाम दिसून आला. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास या भागात झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पंचवटी परिसरातील निशिगंध इमारतीजवळ घडली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रस्त्यालगत असलेले एक जुने आणि मोठे झाड अचानक कोसळले. झाड कोसळतानाच त्याच्या खाली एक दुचाकी आणि एक चारचाकी वाहन अडकले. याच दरम्यान, त्या ठिकाणी जात असलेली काजल (वय अंदाजे २२ वर्षे) ही विद्यार्थिनी झाडाखाली सापडली आणि जखमी झाली. काजल ही सी-डॅक सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

घटनेची माहिती मिळताच पाषाण अग्निशमन केंद्रातील आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अधिकारी शिवाजी मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जवान शशिकांत धनवटे, चंद्रकांत बुरुड, देवीदास चौधरी, शुभम करांडे आणि लुकमान कमलखान यांनी तातडीने कारवाई करत झाडाखाली अडकलेल्या काजलला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर काजलला तत्काळ औंध येथील साईश्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या झाडामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली, आणि नागरिकांत घबराट पसरली होती. मात्र, पुणे महानगरपालिका आणि अग्निशमन विभागाच्या जलद प्रतिसादामुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली आणि कोणताही मोठा अनर्थ टळला.

या घटनेनंतर महापालिकेच्या पथकाने झाड हटवण्याचे काम सुरू केले असून, वाहनांचे नुकसान व परिसरातील सुरक्षितता याचा आढावा घेतला जात आहे. या घटनेनंतर नागरिकांत सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जुन्या झाडांच्या देखरेखीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

7 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago