पुणे

पुणे : कोथरूडमध्ये झाड रिक्षावर कोसळून भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

पुणे : पुण्यात कोथरूडमध्ये आज सकाळी एक मोठं झाड रिक्षावर कोसळून भीषण अपघात झाला. यात पाच जण जखमी झाले. त्यापैकी एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोथरूड येथील दशभुजा गणपती मंदिराजवळ आज सकाळी हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले.

पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 9.15 च्या सुमारास घडली. रिक्षावर एक मोठं झाड कोसळलं, त्यात चालकासह इतर तीन जण जखमी झाले. जखमींपैकी एकाच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी ससून जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर इतरांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात आले.

एरंडवणे अग्निशमन केंद्राचे अग्निशमन वाहन मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, झाडाच्या फांद्या तोडून वाहनांच्या वाहतुकीसाठी त्या रस्त्यावरून हटवण्यात आल्या आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago