पुणे

पुण्यात पुन्हा वीकेंड लॉकडाऊन, असे असतील नवे नियम.. जाणून घ्या

पुणे : पुणे महापालिका हद्दीत पुन्हा एकदा वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याबाबत महापालिकेने आदेश जारी केले असून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. शहरात कोरोना संसर्ग नियंत्रणात राहावा त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वीकेंड लॉकडाऊनमधून यावेळी अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सूट देण्यात आली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले कि, “पुणे महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहणार आहेत तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल.”

विक्रम कुमार यांनी आज याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार असून पुढील आदेशापर्यंत लागू असणार आहे. त्यानुसार रात्री १० वाजल्यानंतर वैध कारणाशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही किंवा फिरताही येणार नाही. पुणे महापालिका हद्द, पुणे कँटॉनमेंट बोर्ड आणि खडकी कँटॉनमेंट बोर्ड या संपूर्ण भागासाठी हे आदेश लागू असणार आहेत.

काय आहे आदेश?

  1. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आठवड्याचे सर्व दिवस सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली राहतील.
  2. इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर शनिवार व रविवार बंद राहणार.
  3. रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट ग्राहकांसाठी शनिवार-रविवार बंद राहतील. केवळ पार्सल सेवेची मुभा. रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल देता येईल.
  4. रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.
  5. वीकेंड वगळता अन्य दिवशी मॉल ५० टक्के ग्राहक क्षमतेने सुरू ठेवता येतील.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago