Pune: Chlorine gas leak in swimming pool, 20 to 22 people have difficulty breathing
पुणे : पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने पोहण्यासाठी आलेल्या २० ते २२ जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आसपासच्या भागातील नागरिकांना खोकला आणि घशाच्या समस्यांसह श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. बचाव पथकाने नागरिकांना तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत अनेक नागरिक बेशुद्ध देखील झाले आणि जलतरण तलावाच्या आजूबाजूच्या 500 मीटर परिसरात वायू पसरला, त्यामुळे जवळचा रस्ता आणि जलतरण तलाव नागरिकांसाठी बंद करण्यात आला.
एका सिलिंडरमध्ये गळती झाल्याचे निदर्शनास आले. क्लोरीन गॅस असलेल्या सिलिंडरमधून गळती सुरू झाली होती. त्यानंतर आवश्यक उपकरणे वापरून अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…