Accident
पुणे : पुणे शहरातील भोसरी परिसरात मंगळवारी पीएमपीएमएल बसने दिलेल्या धडकेत एका 26 वर्षीय पादचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. मृताच्या नातेवाईकाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी पीएमपीएमएल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगद अच्छेलाल तुर्हा (२६, रा. गोपाळगंज, बिहार) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो भोसरी येथील पुणे-नाशिक महामार्गावरून चालला असताना त्याला भरधाव वेगाने येणाऱ्या पीएमपीएमएल बसने धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी मृत तरुणाच्या काकांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) चालकाविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी चालकावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 304 (अ) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 119/117 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील पोलीस तपास सुरू आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…