mumbai pune expressway accident 3 passed away
लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट ते फुडमॉल दरम्यानच्या तीव्र उतारावर ही दुर्घटना घडली. या अपघातात कारमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनर चालकाचे खोपोली एक्झिट ते फुडमॉल दरम्यानच्या तीव्र उतार व वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर एका ट्रकवर मागून जोरात धडकला, तर त्या ट्रकची पुढे जाणाऱ्या एका कारला जोरात धडक बसली. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार जळून खाक झाली. अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये आई, वडील व मुलाचा समावेश आहे. या भीषण अपघातामुळे तिन्ही वाहने मार्गावर पलटली होती.
अपघाताची माहिती मिळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्ग सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी यांचे सहकारी, खोपोली पोलिस, देवदूत आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची पाहणी करुन पोलिसांनी आयआरबीआय कंपनीच्या कामगारांच्या मदतीने व क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. आग लागलेल्या कारला अग्निशमन बंबाच्या सहाय्याने विझविण्यात आलं. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर कार बाजूला काढून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलिस करीत आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…