पुणे

एमपीएससी टॉपर दर्शना पवार खून प्रकरणी मित्र राहुल हंडोरेला अटक, हत्येचे कारण आले समोर

पुणे : एमपीएससी टॉपर दर्शना पवारच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अटक केली आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. तिचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवातून स्पष्ट झाले होते. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला मुंबईतून ताब्यात घेतले. दर्शनाची हत्या केल्याची कबुली देखील राहुलने दिल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे एकमेकांचे दूरचे नातेवाईक आहेत. राहुलला दर्शनासोबत लग्न करायचे होते. परंतु पवार कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. त्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं होतं. तसेच दर्शना नुकतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली, राहुल मात्र परीक्षेत अपयशी झाला होता. त्यातूनच राहुलने दर्शनाची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दर्शना राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवडही झाली होती. पुण्यात तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी नऊ जून रोजी ती पुण्यात आली होती. ती धायरी परिसरात एका मैत्रिणीकडे राहत होती. १२ जून रोजी ती मित्राबरोबर फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. कुटुंबीयांना दर्शनाने याबाबत माहिती दिली होती. तिच्यासोबत मित्र राहुल हंडोरे होता. मात्र, १२ जूनला तिचा मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी सिंहगड रस्ता पोलिसांत दिली.

दरम्यान, राहुल हंडोरे बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनीही तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलिस ठाण्यात दिली. रविवारी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सतीचा माळ परिसरात दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून पोलिसांना समजले कि, दर्शना आणि राहुल १२ जून रोजी दुचाकीवरून वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला परिसरात गेले.
सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे जण गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यानंतर दोघे गडावर गेले. सकाळी दहाच्या सुमारस राहुल एकटाच गडावरून खाली आला. त्यानंतर राहुल वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत होता. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला अटक केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago