पुणे

पुण्यातील ‘बंटी-बबली’ पोलिसांच्या ताब्यात, घरकाम करण्याच्या बहाण्याने चोरी केलेले 254.6 ग्रॅम सोने जप्त

पुणे : घरकाम करण्याच्या बहाण्याने घरफोडी चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 254.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या गुन्हयात अटक केलेली महिला लोकांच्या घरी घरकाम करण्याचा बहाणा करुन एक-एक सोन्याचा दागिना चोरी करत असायची. तसेच अटक केलेला पुरुष चोरी केलेले सोन्याचे दागिने गहाण ठेवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

यासंदर्भात स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड विधान कलम 454,457,380 खाली गुन्हे दाखल आहेत. पोलीस या चोऱ्यांचा तपास करत होते.  या अनुषंगाने वरिष्ठांनी गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत महत्वाच्या सुचना दिल्या होत्या. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी युनिट-2 प्रभारी क्रांतीकुमार पाटील व स्टाफ अशी एक टिम तयार करण्यात आली होती.

दरम्यान, पोलिसांच्या टिमला खात्रीशीर माहिती मिळाली कि, दाखल गुन्हयातील संशयीत महिला व पुरुष हे दोघे स्वारगेट येथे नटराज हॉटेलजवळ सार्वजनिक रोडवर उभे आहेत. त्यानंतर या टिमने आरोपींचा शोध घेवुन त्यांना शिताफीने पकडले. रेखा राहुल क्षिरसागर (वय ३०, रा. जांभुळकर चौक, विठ्ठल मंदिरजवळ, वानवडीगाव, पुणे) आणि ऋषभ विनोद जाधव (रा. स्वामी विवेकानंदनगर, शेवकर वस्ती, बिल्डींग नं. 10, फ्लॅट नं. 301 रामटेकडी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे दाखल गुन्हयातील घरफोडी चोरीबाबत चौकशी केली असता ते उडवा-उडवीची उत्तरे देवु लागले. त्यानंतर त्यांना युनिट-२ कार्यालयामध्ये नेऊन पुन्हा पुर्ण तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांना सदर गुन्हयात अटक करुन पोलीस कस्टडीत घेतले. तपासादरम्यान आरोपीकडुन 12 लाख 73 हजार रुपये किंमतीचे तब्बल 254.६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (100 टक्के) हस्तगत करण्यात यश आले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago