पुणे

पुणे : बी. जे. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीचा वसतिगृहात संशयास्पद मृत्यू; आत्महत्येचा प्राथमिक अंदाज

पुणे : राज्य सरकारच्या अधिपत्याखालील बी. जे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्योती कृष्णकुमार मीणा (वय २०), ही विद्यार्थिनी मंगळवारी मध्यरात्री कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहाच्या आवारात मृतावस्थेत आढळून आली.

ही दुर्दैवी घटना पुण्यातील आगरकर नगर परिसरातील वसतिगृहात घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आत्महत्येचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, मात्र अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या संदर्भात माहिती देताना बंडगार्डन पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र गायकवाड म्हणाले, “मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ती आपल्या खोलीतून बाहेर पडली होती. मात्र, बराच वेळ होऊनही ती परत आली नाही. तिच्याशी संपर्क होऊ न शकल्याने तिच्या रूममेट्स व वसतिगृह प्रशासनाने मध्यरात्री पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, तक्रार नोंदवत असतानाच वसतिगृहातून फोन आला की संबंधित विद्यार्थिनीचा मृतदेह परिसरात आढळून आला आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.”

या घटनेच्या अनुषंगाने पोस्टमार्टमसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार आत्महत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात असला तरी, मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील रहिवासी असून, ती बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होती. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून, त्यात तिने आपल्या शालेय जीवनापासून ती मानसिक तणाव व चिंतेशी झुंज देत असल्याचे नमूद केले आहे. तसेच, तिच्यावर मानसिक उपचार सुरू असल्याचे देखील त्या चिठ्ठीत लिहिले आहे.

या प्रकरणाबाबत माहिती देताना झोन २ चे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते म्हणाले, “चिठ्ठीत तिने मानसिक तणावाविषयी स्पष्ट उल्लेख केला आहे. घटनाक्रम, परिसरातील सीसीटीव्ही फूटेज, रूममेट्सचे जबाब यासह सर्व बाजूंचा सखोल तपास करण्यात येत आहे.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago