पुणे

पुणे : ‘नरभक्षक’ बिबट्याला अखेर शार्पशूटर्सनी गोळ्या घालून संपवले

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या महिनाभरात तीन जणांचा जीव घेणाऱ्या “नरभक्षक” बिबट्याला अखेर वन विभागाच्या शार्पशूटर्सनी ठार केले. मंगळवारी रात्री सुमारे १०.३० वाजता झालेल्या या कारवाईत बिबट्याला गोळी घालण्यात आली.

वन विभागाच्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील मौजे पिंपरखेड परिसरात या बिबट्याने दोन अल्पवयीन मुले आणि एका वृद्ध व्यक्तीचा बळी घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड या भागांमध्ये बिबट्यांचे वाढते दर्शन आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप होता.

रविवारी झालेल्या ताज्या घटनेत १३ वर्षीय मुलाचा बळी गेल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाचे वाहन जाळले. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने तत्काळ विशेष पथक तयार करून बिबट्याला पकडण्याचे अथवा संपवण्याचे आदेश दिले.

जुन्नर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, “मंगळवारी रात्री बिबट्या हल्ल्याच्या ठिकाणापासून सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर दिसला. आम्ही प्रथम त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. उलट तो पथकावर झेपावला आणि आत्मसंरक्षणासाठी शार्पशूटर्सनी गोळीबार केला.” सुमारे पाच ते सहा वर्षांचा हा नर बिबट्या घटनास्थळीच ठार झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह ग्रामस्थांना दाखवून पुढील तपासासाठी आणि शवविच्छेदनासाठी माणिकडोह रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याच दिवशी जवळच लावलेल्या सापळ्यात आणखी एक नर बिबट्या अडकला असून त्याचीही तपासणी केली जात आहे.

या घटनेनंतर परिसरात भीतीचं सावट असलं तरी नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वन विभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि जंगल परिसरात अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago