selling an eight month old girl 4 arrested incident in virar
पुणे : पुणे शहरातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिलेले आहेत. पोलिसांकडे तक्रार आली होती की गोर-गरीबांना अवैधरित्या मासिक 10 टक्के व्याज दराने कर्ज देऊन त्यांच्याकडून सुरक्षा ठेव स्वरुपात कर्जदाराच्या सहीचे कोरे चेक्स, कोरे स्टॅम्प पेपर व इतर
महत्वाची कागदपत्रे घेवून कर्जदाराकडुन मुद्दल व्याजासहीत वसूल करुनदेखील दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी देऊन पिळवणुक केली जात आहे.
दरम्यान, ही तक्रार मिळाल्यानंतर, वरिष्ठांनी युनिट-2 चे पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे व स्टाफला सदर तक्रारीची पडताळणी करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चौकशी करुन भरत बाबू लालजी उणेचा (वय ३६) या व्यक्तीविरुध्द दत्तवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध कायदा 2014 कलम 39, 45 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला, त्यानंतर त्याला दाखल गुन्हयात पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. भरत बाबू उणेचा हा कपडे विक्रीचा व्यवसाय करतो, अशी माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी नागरीकांना आवाहन केले आहे की, संबंधित आरोपीकडुन अशाप्रकारे अवैध सावकारीला बळी पडलेल्या नागरिकांनी गुन्हे शाखा, युनिट २, पुणे शहर कार्यालयाशी संपर्क करावा.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…