पुणे

खेळाडूंना योग्य संधी मिळाल्यास स्थानिक मैदानावरूनही जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : खेळांना प्राधान्य व खेळाडूंना योग्य संधी मिळवून दिली पाहिजे, आपल्या मुलांमधील क्रीडागुणांना वाव द्यायला हवा. असे झाल्यास स्थानिक पातळीवरील मैदानावरूनही जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होऊ शकतात, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्यावतीने हांडेवाडी रोड, महम्मदवाडी येथे उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, हे शासन सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, गोरगरिबांचे सरकार आहे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्याच्या तसेच सर्वसामान्यांच्या विकासासाठी जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करू. राज्यातील अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली, भंडारा, गोंदिया तसेच इतर भागात जाऊन पाहणी केली आहे. अतिवृष्टीमुळे जीवितहानी, वित्तहानीचा आढावा घेतला असून नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. विभागस्तरावर जाऊन शेतीचे नुकसान, पिकांचे प्रश्न, विकासाचे प्रकल्प आदींबाबत आढावा घेण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी शिंदे यांच्या हस्ते महानगरपालिकेच्यावतीने सुमारे ४ कोटी रुपये खर्चून उभारणी केलेल्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. मैदानाच्या उभारणीमध्ये काम केलेले कंत्राटदार, मनपा अभियंते यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री उदय सामंत, तानाजी सावंत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार दिलीप लांडे, शरद सोनवणे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त विलास कानडे, माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे आदी उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago