Accident
पुणे : पुण्यात सातववाडी भागात दुचाकीला ट्रकनं धडक दिल्यामुळे बाप-लेकीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. पुणे सासवड रोडवर सकाळी मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना ट्रकच्या धडकेत वडिलांचा मृत्यू झाला. तर उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मुलीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज (१९ जुलै) सकाळी सातच्या सुमारास सातववाडी येथील ग्लायडिंग सेंटर समोर झाला. या दुर्दैवी घटनेत नीलेश साळुंखे (वय 35, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) आणि मीनाक्षी साळुंखे (वय 10) या बाप-लेकीचा मृत्यू झाला. तर ट्रकचालक दिलीप कुमार पटेल (मध्य प्रदेश) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
मीनाक्षी साळुंखे ही मुलगी साधना विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती. तिचे वडील नीलेश तिला शाळेत सोडण्यासाठी फुरसुंगीहून हडपसरच्या दिशेने चालले होते. याचदरम्यान, सातववाडी येथे पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये नीलेश हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मीनाक्षी दूर फेकली गेल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेत तिचादेखील मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.
या घटनेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कि, “पुण्यात सातववाडी भागात दुचाकीला ट्रकनं उडवल्यानं फुरसुंगीचे नितीन साळुंखे आणि त्यांची दहा वर्षांची शाळकरी मुलगी मीनाक्षी यांचा झालेला मृत्यू अस्वस्थ करणारा आहे. चूक कोणाची हे तपासातून स्पष्ट होईल, पण आपलं वाहन जबाबदारीनं चालवा, असं सर्वांनाच आवाहन. साळुंखे आणि मुलीस श्रद्धांजली!”
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…